
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पवनानगर: गेल्या काही दिवसांपासून मावळात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वच ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या तुडुंब ओढे-नाल्यांमुळे पवन मावळ परिसरातील मळवंडी ठुले धरण १०० टक्के भरले आहे. कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
पवनानगर जवळील मळवंडी ठुले हे धरण १०० टक्के भरले आहे. धरणात ३.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. सदर तलाव हा “द्वारविरहित” म्हणजेच Ungated आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरून कोथुर्णे ओढ्याद्वारे पवना नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरु झालेला आहे.
तरी वारू, कोथुर्णे, ब्राह्मनोली, कालेपर्यंतच्या सर्व ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, आणि सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
About The Author

