Spread the love

विशाल विकारी कार्याध्यक्ष तर रामदास वाडेकर यांची सचिव पदी निवड

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदग्रहण समारंभ पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धरतीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम यांचा देखील समावेश केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागत विशाल विकारी यांनी केले. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी तर सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले. अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *