बांबू, शेवगा आदी रोपे मोफत देणार
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने बांबू. शेवगा आदी उपयुक्त देशी वृक्ष प्रजातीच्या लागवडीसाठी नागरिक व विकासंकाना आवाहन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने आरोग्यदायी गुणधर्म असलेली शेवगा प्रजातीची रोपे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिक व विकासंकानी आपल्या परिसरात सोसायटी. प्लॉट संस्था परिसरात हि रोपे लावून त्याचे योग्य संगोपन करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले असून ही मोहीम २ ते १० जुलै २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
सदरील रोपे नगरपरिषद कार्यालयात मोफत वितरित केली जातील.हि रोपे घेणाऱ्या प्रत्येकाने संगोपन हमीपत्र भरून देणे अनिवार्य आहे. हमीपत्र दिल्यानंतरच रोपे वितरित केली जाणार आहे तसेच उपलब्ध रोपे मर्यादित असल्यामुळे पहिले येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार सदरील रोपे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या संदर्भात बोलताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक म्हणाले की, पर्यावरण संरक्षण ही सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सर्वांनी मिळून हरित तळेगाव शहर साकारण्यासाठी पुढे यावे.
About The Author

