
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव म्हणून सर्वत्र साजरे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या स्त्री सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या. त्या अनुषंगाने मावळ तालुक्यात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उच्चशिक्षित महिला डॉक्टरची निवड करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे येथील मानाचा पाचवा गणपती व नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असणाऱ्या श्री गणेश तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५-२०२६ करिता अध्यक्ष म्हणून डॉ .राधिका चव्हाण-हेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
तसेच उपाध्यक्षपदी प्रशांत खर्डेकर, सिद्धेश जाधव, कार्याध्यक्षपदी भूषण शिरसाट,खजिनदारपदी प्रणव लऊळकर, चिटणीस पदी प्रतीक माने, अवधूत कुलकर्णी, सांस्कृतिक प्रमुख मुक्ता भावसार, मंडप प्रमुख ओंकार मेढी, आर्य मेढी, सजावट प्रमुख प्रतीक मेहता, धार्मिक प्रमुख केदार मेढी ( गुरुजी) प्रथमेश भालेराव, अक्षय कुलकर्णी, अहवाल प्रमुख शुभम फाकटकर, ढोल पथक प्रमुख- यश झोडगे, साहिल गुप्ते, ईशान धर्माधिकारी, प्रसार व संपर्कप्रमुख महेश सोनपावले, रोहन मराठे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाची स्थापना १९०२ साली झाली असून मंडळ या वर्षे १२३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
About The Author

