Spread the love

तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
‎विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या‍ अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगरपरिषद, नगरपरिषद शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन व तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग तसेच पंचायत समिती वडगाव मावळ आरोग्य विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थी वाहतूक, सुरक्षितता व आरोग्‍य याबाबत तळेगाव दाभाडे कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व ज्यु. कॉलेज यांचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांची बैठक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. सदर सभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, कन्‍हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन गणेश लोंढे, वरिष्ठ पोलिस उपनिरिक्षक, तळेगाव दाभाडे वाहतूक शाखा प्रमुख, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी ठोंबरे व प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे हे उपस्थित होते.
सदर सभेमध्ये १३ मे २०२५ च्या‍ शासन निर्णयाच्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सुचना व मार्गदर्शन करण्यावत आले.
१. लैंगित गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मधील तरतूदींची अंमलबजावणी करणे.
२. शाळेतील सर्व माध्‍यमांच्‍या सर्व व्‍यवस्‍थापनांच्‍या शाळांमध्‍ये तक्रारपेटी बसविण्याबाबत.
३. शाळा व परिसरात CCTV बसविणे बाबत.
४. कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी प्राधान्याने करुन घेणे बाबत.
५. विद्यार्थी वाहतुकीबाबत सुरक्षेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत.
६. विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत.
७. विद्यार्थी आरोग्याबाबत.
विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी शाळांच्या वेळांमुळे शहरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने लवकरच पोलिस विभागाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येणार असल्या‍चे सांगितले व विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांच्या चांगल्या वाईट सवयींबाबत काय उपाययोजना करता येईल या बाबत मार्गदर्शन केले. मिटिंगचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केशव चिमटे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *