
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केले त्याबद्दल आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर येथे रविवार 6 जुलै रोजी दुपारी तीन वाजता संकल्प सिद्धी 11 वर्षे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये अकरा वर्षात झालेल्या विविध विकासातील कामकाजाबद्दलची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या संयोजनाखाली व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
रविवार 06 जुलै रोजी आषाढी एकादशीचा पवित्र दीन हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने पावन झालेल्या संत तुकारामनगरमध्ये विविध कार्यक्रमाने यंदा आपल्या सर्वांच्या सहभागाने जल्लोषात साजरा होत असल्याने आपल्या परिवारासह सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माधुरी मिसाळ तसेच विधानसभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार महेश दादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे तसेच प्रमुख वक्ते माजी खा. अमर साबळे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शत्रुघ्न काटे, प्रांत प्रतिनिधी भाजपा सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पलांडे, विजय उर्फ शीतल शिंदे, विलास जी मडगिरी, ॲड. मोरेश्वर शेडगे, संजय मंगुडकर, माऊली थोरात, मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या 941 सदनिकाधारक व 22 दुकानदार सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी सर्व संत तुकाराम नगर हे साक्षात पंढरपूर होणार असून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या जिवंत प्रतिकृतीचे मिरवणूक तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र गाथा व श्री ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या ग्रंथांसह श्री विठ्ठलाच्या पादुकांची पालखी संत तुकाराम नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,
(एच ए मैदानातील पेट्रोल पंप समोरील, संत रोहिदास महाराज यांचे मंदिर शेजारी ) येथून शेकडे वारकऱ्यांसह,भजनी मंडळासह दुपारी 1:00 वाजता दिंडी निघणार आहे, महेश नगर, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर मधील श्री दत्त मंदिर, श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर, श्री. तुळजाभवानीमाता मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री शनी मंदिर येथून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ही दिंडी पोहोचणार आहे, या भव्य दिंडीचे, पालखीचे तेथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे, दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांचे यतोचित स्वागत झालेंनंतर त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशी दिवशी रविवारी दिनांक ०६ जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तरी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वच भाविकांना निमंत्रण देण्यात येत आहे आपण आपल्या परिवारासह आषाढी कार्तिकी निमित्त होणाऱ्या प्रथम पवित्र सोहळ्यास सहभागी होऊन हरी भजनाचा लाभ घ्यावा व देशाप्रती देखील आपले प्रेम व्यक्त व्हावे याकरता या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आचार्य अत्रे रंगमंदिर बेसमेंटमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
About The Author

