
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर जिल्हा लातूर आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी श्री. संत सेना महाराज मंदिर, लातूर या ठिकाणी पार पडणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात मावळ भूमीचे शिव व्याख्याते, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक ०६ जुलै रोजी होणार असून श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन संस्थापक अध्यक्ष कवी गोविंद संभाजी श्रीमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या कवी संमेलनाचे संमेलन अध्यक्षा कवयित्री पूजा माळी असणार आहेत.
About The Author
