
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मा.गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील पशुधनांच्या लंपी चर्मरोग उपाययोजनांसाठी लसपुरवठा व लसीकरण करण्यात यावे, यासाठी मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी मा. प्रधान साहेब व पशु वैद्यकीय अधिकारी मा. राक्षे साहेब यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तालुका प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, तालुका उपाध्यक्ष अनिल खांदवे, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, युवक अध्यक्ष सुनिल चव्हाण, मा.ग्रा. पं. सदस्य बारकूभाऊ ढोरे, योगेश भेगडे आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील पशुधनांना लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याची दिसून येत आहे. पशुधनासाठी हा विषाणूजन्य साथीचा आजार असल्याने मावळ तालुक्यातील काही जनावरांना त्याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. विशेषतः हा आजार गाईं व बैलामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यामुळे पशुधन व दुग्ध, शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो या लंपी चर्मरोगास वेळीच आटोक्यात आणून पशुधनांना वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून संपूर्ण मावळ तालुक्यातील पशुधनांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करून योग्य ती काळजी घ्यावी व लस पुरवठा अधिक जलद गतीने करावा.
मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय प्राधान्य देत आहेत, त्यामुळे तालुक्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सततच्या अतिवृष्टी पावसामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम निघून गेलेला आहे त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला लंपी चर्म रोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण व औषध उपचार १०० % मोफत होणे आवश्यक आहे.
मावळ तालुक्यातील पशुधन या रोगापासून बचाव करण्यासाठी मावळ पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना सुरू कराव्यात व हा चर्मरोग लंपी आजार नष्ट करण्याची आवश्यक असणारी लसीकरण तात्काळ तालुक्यात उपलब्ध करून संबंधित डॉक्टरांना प्रत्येक गोठ्यावरती घरी जाऊन हे लसीकरण मोफत करण्यात यावे.
About The Author

