
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

वडगाव येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांना होत असलेल्या गैरसोयबाबत मावळ युवा सेना मावळच्या वतीने निवेदन देण्यात आले. दहावी व बारावीच्या व इतर शालेय प्रवेश प्रक्रिया सुरु असून,अनेक विद्यार्थी व पालक आपल्या नागरी सुविधा केंद्रात उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर व रहिवाशी व शेतकरी (७/१२ अर्ज सहित) शासन निर्मित जाती निहाय दाखले किंवा इतर कामाबाबत विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी येत आहेत. परंतु तांत्रिक अडचणी सांगून गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांना कोणतेच दाखले मिळत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचणी येत असून, त्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. गेले पंधरा दिवसांपूर्वी सुद्धा माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही युवा सेनेच्या वतीने पाठपुरावा केला होता पण जैसे थी परिस्थिती असून या गैरसोयींबद्दल युवा सेनेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ व तळेगाव व लोणावळा येथून अनेक नागरीक, विद्यार्थी, पालक यांना रोज हेलपाटे मारावे लागत असून, यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी देखील नागरिकांशी योग्यरित्या बोलत नाहीत. कर्मचा-यांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. यामध्ये देखील सुधारण होणे गरजेचे आहे तसेच नागरी सुविधा केंद्र दर्शनी ठिकाणी स्थलांतरित करावे, ही प्रमुख मागणी आहे. जर लवकरात लवकर नागरी सुविधा केंद्रातील समस्या दूर केल्या नाही तर युवा सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
सदरील निवेदन देताना युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे, युवा सेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, शिवसेना उपतालुका
प्रमुख रामभाऊ सावंत, शिवसेना तालुका संघटक अमित कुंभार, युवा सेना उपतालुका प्रमुख राज मुर्हे, शिवसेना उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, शिवसेना विभाग प्रमुख सहादू बडेकर, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, शिवसेना सोशल मीडिया राज्य समन्वयक यश कदम, समीर सातकर आदी उपस्थित होते.
About The Author

