Spread the love

तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
येथील हरणेश्वर वाडी येथे असणाऱ्या महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी गुरुवार (दि. १०) जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी मावळ तालुकाध्यक्ष नितीन मारुती ओव्हाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती समोर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. वंचित बहुजन आघाडी मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांनी गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या सर्व उपासक व उपासिकांना मार्गदर्शन केले. तळेगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान हे संविधान भूमी म्हणून ओळखले जाते. याच निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४९ते १९५६ पर्यंत वास्तव्य केले होते. या निवासस्थानाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याच निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानावर महत्त्वपूर्ण काम केले होते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, महासचिव लहू लोखंडे, मावळ तालुका उपाध्यक्ष सुनील वाघमारे, मावळ तालुका युवा अध्यक्ष संदीप कदम, तालुका महिला अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, महासचिव हर्षदा गजरमल, वडगाव शहराध्यक्ष पवन उदागे, तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *