Spread the love

रस्ता झाल्यापासुन अपघात होण्याच्या प्रमानात वाढ..!

हाणेगाव प्रतिनीधी /फारुख पटेल:

देगलुर तालुक्यातील हाणेगाव येथुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161A हे वझर ते कुंदराळा नांदेड मार्गाला जोडणारा रस्ता बनला मृत्युचा सापळा हा रस्ता झाल्यापासुन रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमान वाढले असून जवळपास ३० ते ३५ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे म्हणुन याकडे संबंधीत विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे .

हाणेगाव हा तिन राज्याच्या सिमेवरती वसलेले गाव असल्यामुळें या रस्त्यावर रहदारी मोठी असते प्रवाशी वर्गाला व एस टी ला थांबायला जागा नसल्यामुळे थेट रोडावरच वाहने थांबवुन प्रवाशी वाहनात बसवले जातात यावेळी समोरुन किंवा पाठीमागुन वाहन कधी येईल आणि कोनाला धडक देईल याचा नेम राहीला नाही म्हणुन सध्या परीस्थितीला बसस्टॉप होण्याची गरज आहे . उदगीर देगलुर औराद बसेसला रात्री थांबण्यासाठी जागाच नसल्यामुळे वाहन रोडावर लावल्यामुळे अपघात होत आहेत परीसर मोठा असल्यामुळे प्रवाशांची व वाहणांची ये-जा जास्तच असते लोकांना स्थानिक पातळीवर बसस्टॉप नसल्यामुळे कोन्ही थांबल्या वाहनाला धडक मारतो तर कोनी चालत्या बसलाच धडक मारल्यामुळे अपघातात वाढ होत आहे म्हणुन याची दखल संबंधीत विभागाने घेण्याची गरज आहे, जर गावालगत रस्त्याचं योग्य नीयोजन व तिन्ही चौकात गतीरोधक बसवले तर अपघात होण्यापासून बचाव होईल अशी चर्चा स्थानीक नागरीकातुन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *