Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड तसेच एमआयडीसी परिसरातील हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यसेवेसाठी कार्यरत असलेल्या ई.एस.आय. (ESI) रुग्णालयामध्ये अद्ययावत यंत्रसामग्री, कित्येक वर्ष जुन्या कॉट गाद्या बदलण्यात, मूलभूत सुविधांचा अभाव गंभीर स्वरूप धारण करत आहे.

या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष कु. दुर्गा भोर यांनी ठोस भूमिका घेत कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री व आवश्यक सुखसोयी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा नसल्यामुळे कामगारांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये लाखो महिला कामगार काम करतात त्यांच्या रीतसर नोंदण्या तसेच सोनोग्राफी मशीन सिटीस्कॅन मशीन आणि महिला आरोग्यासाठी लागणारे सर्व सुविधा या ठिकाणी मेळाव्यात या ठिकाणी हॉस्पिटलचे स्वतंत्र कॅन्टीन निर्माण करण्यात यावे, जेणेकरून रुग्णांना जेवणाची सोय होईल

कु दुर्गा भोर यांनी म्हटले आहे.

“कामगार वर्ग हा आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी जीवघेण्या परिस्थितीत काम करतो. त्यांना हक्काच्या आरोग्यसेवेसाठी वणवण फिरावी लागते हे खेदजनक आहे. ई.एस.आय. रुग्णालयात आधुनिक तपासणी यंत्रे, महिला व बालकांसाठी स्वतंत्र सुविधा, व स्वच्छता यंत्रणा उपलब्ध करून देणे तातडीचे आहे.”

 

प्रशासनाकडे पुढील प्रमाणे मागण्या केल्या –

◼️अद्ययावत तपासणी आणि उपचार यंत्रसामग्री रुग्णालयात उपलब्ध करणे.

◼️महिला कामगारांसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती कक्ष.

 

◼️बालरोग तज्ज्ञ व बालकल्याण कक्ष.

 

◼️कामगारांसाठी हेल्थ कार्ड व वैद्यकीय सेवा सुलभ

करणारी प्रणाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *