
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे यांनी केले आवाहन
हाणेगाव प्रतिनिधी : फारुख पटेल
देगलूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या आदेशानुसार दि. 04 ऑगस्ट 2025 वार, सोमवार रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी सह इतर मागण्या संदर्भात हणेगाव ते देगलुर उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे. यााा मागण्यांसाठी आपण निवेदन, उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, व उपअधीक्षक कार्यालय , मरखेल पोलिस स्टेशन, देगलूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले आहे तरी या पदयात्रेत हाणेगाव परीसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेना देगलुर तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, उपतालुका प्रमुख उत्तम अन्सापुरे, दिलीप ईनामदार,मानाजी लोणे, पवन ईनामदार, भागवत पाटील सोमुरकर, दशरथ मोरे, गंगाधर पाटील आदीजन उपस्थित होते.
About The Author
