
मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुका मधील १०३, ग्रामपंचायतमधील व शहर विभागच्या समस्या बाबत आम सभा घेण्यात यावी, यासाठी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजुभाऊ खांडभोर यांच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यच्या १५ ऑगस्टच्या तारखे नुसार किंवा सन्मानित मावळ मधील खासदार आमदार व इतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम सभा घेण्यात येत आहे आम सभा म्हणजे सर्व सामान्य जनेतेच्या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडन्याचं एक साधन म्हणजे आम सभा सर्व शासकीय खाते प्रमुख निहाय जनते समोर ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं माध्यम व गोरगरीब, शेतकरी, दिन दलित यांचे प्रामुख्याने प्रश्न सोडवण्याच साधन म्हणजे तालुका आम सभा. म्हणून मावळ शिवसेनेची आग्रहाची भूमिका आहे कि, प्रत्येक ग्रामपंचायत ग्राम सभा घेऊन त्यांची अंमल बाजवणी करणे व सर्व खाते निहाय शासकीय खाते प्रमुख अधिकारी आपल्या कामात योग्य आहे का खरच ते कामे करतात का किंवा ग्रामपंचायत नियम नुसार कामे होतात का?
या बाबत स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार सुनील आण्णा शेळके व जिल्हा परिषद पुणे चे प्रमुख गट विकास अधिकारी मावळ व मावळ मधील
सर्व खाते प्रमुख या अधिकारी मार्फत आम सभा लवकर घेणे असे निवेदन शिवसेना पदाधिकारी मावळ तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
यावेळी युवा सेना अध्यक्ष राजेश वाघोले, युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुळावले, संघटक मदन शेडगे, चंद्रकांत भोते, उप तालुका प्रमुख राम सावंत, उप तालुका सोमनाथ कोंडे, विभाग प्रमुख सहादू बडेकर, नवनाथ सेठ हारपुढे इत्यादी उपस्थित होते.
About The Author
