
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कलापिनीमध्ये नुकत्याच साने गुरूजी कथामाला, समर्थ सेवा मंडळ आणि कलापिनी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक पांठातर स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा शालेय विद्यार्थ्याच्या ५ गटात आणि खुल्या गटात घेण्यात आल्या. यावर्षी विविध गटातील २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षक उज्ज्वलाताई डांगरीकर तसेच डॉ. दामोदर कुलकर्णी यांचा परिचय विनया मायदेव यांनी करून दिला. नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कलापिनीचे विश्वस्त डॉ. परांजपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात परीक्षक डॉ.दामोदर कुलकर्णी यांनी ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाल्याचे सांगितले.असे धार्मिक सुसंस्कार विद्यार्थ्यावर करण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्याना आणि पालकांना हे श्लोक वर्षभर पाठ करून पुढील वर्षी पुन्हा भाग घेण्यास प्रोत्साहन दिले.प्रमुख अतिथी सुषमाताई वैद्य यांनी मनाचे श्लोक कसे आपल्या व्यक्तिमत्वात चांगले बदलघडवून देतात हे अगदी सहज आणि सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितले. नंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
निकाल पत्र – बालवाडी गट : प्रथम : शांभवी कुलकर्णी, लिटिल बर्ड प्रीस्कूल, द्वितीय : अद्वैत नामजोशी, ज्यु.केजी, एम्प्राॅस इंटरनॅशनल स्कूल, तृतीय : स्वस्तिक बच्चे ,मोठा गट, आदर्श विद्या मंदिर . उत्तेजनार्थ बक्षिसे : परीक्षित भोईर, सी. केजी, हचिंग स्कूल.,शिवांजली बबन मनाळ,मोठा गट, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, श्वेता पंडित बिराजदार ,मोठा गट ,आदर्श विद्यामंदिर.
प्रोत्साहन पर बक्षिसे : १)मिहिरा अविनाश उत्तेकर ,मोठा गट, पैसाफंड प्राथमिक शाळा, २)यथार्थ जामदार, लिटिल बर्ड्स प्री स्कूल , ३)हिंदवी सगर, आदर्श विद्यामंदिर, ४)सान्वीका अवधूत पाटील, सीनियर केजी, जैन इंग्लिश स्कूल, ५)आराध्या सचिन वसव, मोठा गट, पैसा फंड प्राथमिक शाळा .
पहिली दुसरी गट १) प्रथम : विवान अमोल बेले, २री क, पैसा फंड प्राथमिक शाळा २)द्वितीय : अद्वैत मंदार दामले, पहिली ब, सरस्वती विद्या मंदिर ३)तृतीय : शौर्या सचिन करांडे, पहिली क , पैसाफंड प्राथमिक शाळा.
उत्तेजनार्थ बक्षिसे: १)शार्विल प्रसाद पालकर ,दुसरी, बालविकास विद्यालय ,२)मुग्धा कुबल,पहिली ,जैन इंग्लिश स्कूल, ३)स्वरूप संतोष जोशी, पहिली, सरस्वती विद्यामंदिर. प्रोत्साहन पर बक्षीसे १)अनुश्री राहुल पवार ,दुसरी अ, पैसाफंड प्राथमिक शाळा, २)मिताली सुहास पळे, दुसरी, सरस्वती विद्या मंदिर, ३)दित्या योगेश पन्हाळे, दुसरी, सरस्वती विद्या मंदिर, ४)सान्वी सुमित गायकवाड, पहिली सरस्वती विद्या मंदिर.
इयत्ता तिसरी चौथी गट १)प्रथम : ओवी राहुल वीर, चौथी, सह्याद्री इंग्लिश स्कूल. २)द्वितीय क्रमांक : अद्वैता विशाल कुलकर्णी बालविकास विद्यालय ,३)तृतीय क्रमांक : शशांक सुभाष महाले, चौथी, आदर्श विद्यामंदिर. उत्तेजनार्थ बक्षिसे: १)प्रत्युषा अमोल नवले, तिसरी, पैसाफंड प्राथमिक शाळा,२)अद्वैत मंदार खरे, तिसरी, सरस्वती विद्या मंदिर. प्रोत्साहन पर बक्षिसे :- १)आरोही योगेश पाटील ,तिसरी आदर्श विद्या मंदिर, २)स्वराली बालाजी जाधव ,चौथी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, ३)मधुरा ऋषिकेश पांडे ,चौथी, इंद्रायणी इंग्लिश स्कूल, ४)अन्वय प्रवीण फुटाणे, तिसरी, सरस्वती विद्या मंदिर .
पाचवी ते सातवी गट १)प्रथम : विवान रुपनवर, सातवी पोदार इंग्लिश मीडियम स्कूल, २)द्वितीय:सौम्या अमोल अलबते, सहावी, आदर्श विद्या मंदिर , ३)तृतीय : सुज्वल पंकज माळुंजकर पाचवी, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन . उत्तेजनार्थ बक्षिसे: १)स्पृहा सरवटे ,पाचवी ,पोदार इंग्लिश मीडियम स्कूल ,२)अनुष्का माधव कदम, सातवी, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल .
प्रोत्साहन पर बक्षीसे : १)रिद्धी रविकांत साखरे, सातवी सरस्वती विद्या मंदिर, २)श्रावणी प्रशांत घोरपडे ,सहावी, आदर्श विद्या मंदिर, ३)यशश्री धोंडीबा घारे, सातवी, आदर्श विद्या मंदिर, ४)प्रांजल चंद्रकांत उंडे, सहावी, आदर्श विद्या मंदिर.
आठवी ते दहावी गट १)प्रथम : विभूती सुहास जोशी आठवी, सरस्वती विद्या मंदिर. २)द्वितीय : स्वरा योगेश पन्हाळे, आठवी ,सरस्वती विद्या मंदिर. ३)तृतीय : गौरी मनोज सुंडे,८अ, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल. उत्तेजनार्थ बक्षिसे : १)निमिषा अनिल चव्हाण,८अ, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, २) शर्वरी अमित गायकवाड,८अ, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
प्रोत्साहन पर बक्षिस १) श्रावणी संदीप देवकर, नववी, भैरवनाथ विद्यामंदिर, वराळे, तालुका मावळ . खुला गट (कोणत्याही दोन मनाचे श्लोकांचे पाठांतर व निरूपण ) १)प्रथम : श्रीमती आरती खंडागळे २)द्वितीय : संपदा नातू , उत्तेजनार्थ :-हर्षदा सागर शिंदे . मनाचे शंभर श्लोक पाठांतर विशेष स्पर्धा एक हजार रुपयांचे विशेष बक्षीस विजेत्या : आरती खंडागळे व ऋचा कुलकर्णी हीने ५० श्लोक पाठ केल्याबद्दल विशेष कौतुक व तीनशे रुपये चा पुरस्कार.
ज्योती ढमाले यांनी आभार प्रदर्शन केले तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रुपाली ठाकुरदेसाई यांनी केले.दिपाली जोशी आणि रुपाली पाटणकर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.
About The Author
