
पिंपरी चिंचवड.आय टि पार्क क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू होणार
पुणे : प्रतिनिधी
पु्ण्यात डबल-डेकर बस सेवा सुरू करण्यासाठी PMPMLसज्ज झाले आहे. यावेळी या बसेस आधुनिक इलेक्ट्रिक स्वरूपात असणार आहेत. सुरुवातीला ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख IT पार्क क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल, ज्यात हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात स्विच मोबिलिटीचे एक पथक प्रस्तावित मार्गांची पाहणी करण्यासाठी पुणे शहरात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. यामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली बसवण्यात येईल. या बसेसना लंडनच्या रेड बसेस प्रमाणे डिझाइन असेल.आरामदायक प्रवासासाठी अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टीम बसमध्ये असेल. या प्रत्येक बसमध्ये ७० प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आणि ४० प्रवाशांसाठी उभे राहण्याची व्यवस्था असेल, ज्यामुळे एकावेळी १०० पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करणे शक्य होईल. यामुळे नेहमीच्या बसेसच्या तुलनेत प्रवाशांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. पुणे मेट्रो स्टेशन किंवा उड्डाणपुलांना अडथळा आणणार नाहीत, एवढ्या उंचीच्या या बसेस असणार आहेत.
एक डबल-डेकर बस सुमारे २ कोटी किमतीची आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असला, तरी जुन्या डिझेल डबल-डेकर बसेसच्या तुलनेत त्यांचा देखभाल खर्च कमी असेल, अशी अपेक्षा PMPML अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
About The Author
