
शहर खड्डे मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त तसेच भागातील आणि प्रभाग क्र. १ मधील न्यू तुंगार्ली, इंदिरानगर, अंबरवाडी रोड, गोल्ड व्हॅली परिसर, प्रिचली हिल या विभागातील रस्त्याची परिस्थिती खुप खराब असून त्या रोडवर खुप खड्डे पडले आहेत आणि त्या खड्ड्यात बाईक चालवताना पडत असतात हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा व मनसे लोणावळा अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशउत्सव येत असून या रोड वरून गणेश मिरवणूक निघत असते आणि या रोडची परिस्थिती खुप गंभीर असून लवकरात लवकरच आपण हे काम मार्गी लावावे, अशा मागणीचे निवेदन लोणावळा नगरपरिषदेला करण्यात आले.
लोणावळा शहरातील कामे मार्गी न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रवक्ते अमित भोसले, सुनिल साळवे, संघटक अभिजित फासगे, सुनील सोनावणे, निलेश लांडगे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, आकाश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
