
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्या साठी घेतलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “ हर घर तिरंगा-२०२५ मोहीम हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२५ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन नगरपरीषद प्रशासन संचालनालय यांचे दि. ०१/०८/२०२५ रोजीच्या पत्रान्वये दिनांक १३ ऑगस्ट २०२५ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खासगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करून स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग नोंदवावा. त्या अनुषंगाने आपण दिनांक १३ ऑगस्ट २०२५ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये आपले घरावर तिरंगा फडकवून तसेच तिरंग्या सोबत स्वतःचे सेल्फी काढून अभियानामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा व सहभागी झालेबाबत चे कुटुंबासोबत फोटो #harghartiranga 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडीयावर तसेच www.harghartiranga.com या संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करुन प्राप्त झालेले प्रमाणपत्र सोशल मिडीयावर टॅग करण्यात यावे.
झेंडा फडकविण्याबाबतचे नियम:-
१. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे.
२. तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
३. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर नागरिकांनी सन्मानाने
व सुरक्षित ठेवावे.
४. अभियान कालावधी नंतर तिरंगा फेकला जाऊ नये,तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
५. अर्धा झुकलेला,फाटलेला,कापलेला तिरंगा कुठल्याही परीस्थितीत लावला जाऊ नये. असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
About The Author
