
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्र व २४२ बटालियन crpf तळेगाव दाभाडे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावच्या महिला सदस्यांनी सर्व रुग्णमित्रांना पर्यावरण पूरक राख्या बांधल्या.
संजीवनी संस्था तळेगाव येथील विद्यार्थिनी या प्रसंगी उपास्थित होत्या त्यांनी सुद्धा रुग्णमित्रांना राख्या बांधल्या. केअरींग हॅन्डस् संस्थेमधे मुलांनी तयार केलेल्या पर्यावरण पुरक राखी मधे झाडाचे बी होते व ते बी आपल्या परिसरात रुजवून आजच्या रक्षाबंधनच्या आठवणी झाडाच्या रूपाने बहरत राहव्यात व पर्यावरणाला मदत व्हावी असा उद्देश होता.
तसेच संकटाच्यावेळी देवासारखे मदतीला येणारे व देशाच्या सिमेवर रक्षण करणारे जवान बांधवांना २४२ बटालियन crpf तळेगाव दाभाडे येथील कॅम्पमधे पर्यावरण पुरक रक्षाबंधन साजरे केले.
या कार्यक्रमाला २४२ बटालियनचे कमांन्डेंट आॅफिसर श्रीमान महंमद युसुफ सर , ट्यायसी डाॅ.नासपुरी संदिप सर , डेपुटी कमांन्डेंट कृष्णकांन्त झां सर , एस . एच. सोबिन सर असिस्टंट कमांन्डेंट , व सर्व जवान तसेच रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव चे अध्यक्ष रो. संतोष शांताराम परदेशी, उपाध्यक्ष रो. प्रशांत रामचंद ताये, सचिव रो. प्रदीप टेकवडे, प्रकल्प प्रमुख रो. सुजाता देव, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक श्री. हर्षल पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. सुजाता देव यांनी केले. श्री. हर्षल पंडित यांनी स्माईल विषयी माहिती दिली व रुग्णमित्रांना शुभेच्छा दिल्या. रोटरीचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच असिस्टंट गव्हर्नर रो. दीपक फल्ले यांनीही आपले मनोगत व्यक्त करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. रो. प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रो.राकेश गरुड ,रो.अमेय झेंड ,रो.निखिल महापाञा ,रो.दिक्षा वायकर ,रो.मेधा शिंदे ,रो.दिनेश चिखले , संजीवनी संस्थेच्या विद्यार्थीनी
स्माईलचे श्री. राहुल बोरुडे, श्री. रोहन यादव, श्री. प्रकाश धिडे, श्री. अनिल सावंत, श्री. राहुल केळकर, श्री. नितीन नाटेकर, श्री. जयंत खेर्डेकर, श्री. आनंद भागवत, श्री. अजिंक्य देशपांडे तसेच स्माईचे सर्व कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.
About The Author
