
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वडगाव मावळ येथील पोलीस स्टेशन येथे पोलीस बंधूना आणि भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करून पोलीस बांधवांना त्यांच्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे जाणीव करून देण्यात आली. पुणे शहर येथे 3 युवतींसोबत झालेला अन्याय पाहता पोलीस प्रशासन हे जबाबदार खाते राहिले नसून येथे रक्षकच भक्षक होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज वडगाव मावळ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार, व पुणे जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसैन यांच्या मार्गदर्शनानुसार 12 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात आले. भविष्यात कुठल्याही महिलेवर अन्याय होत असेल तर जबाबदारीने कर्तव्याचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मावळ तालुका अध्यक्ष मनीषाताई ओव्हाळ, महासचिव हर्षदा गजरमल, सचिव शारदाताई ठुले, पदाधिकारी ज्योतीताई गायकवाड, संघटक कविताताई वासनिक, वडगाव शहर संघटक बोधिमाला उके, मोहितेवाडी महासचिव वैशालीताई गायकवाड, मावळ तालुका सदस्य अरुणा गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमन ताई गुणवडीकर, स्नेहल चौरे आदी उपस्थित होते.
About The Author
