
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी दहा लाखांच्या कामांचा शुभारंभ
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
मावळ तालुक्यात सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधीतून तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. वडगाव आणि तळेगाव-दाभाडे येथे खासदार बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.
या वेळी आमदार सुनील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, महिला जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तालुका प्रमुख राम सावंत, शहर प्रमुख देवा खरटमल, युवासेना मावळ प्रमुख राजेश वाघोले, विशाल हुलावळे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव-दाभाडे येथील यशवंतनगरातील गोळवलकर गुरूजी मैदान व उद्यान सुशोभीकरणाची स्थानिकांची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. या कामासाठी खासदार बारणे यांनी विशेष निधीतून ५० लाखांचा निधी मंजूर केला असून, इतर पूरक विकासकामांसह एक कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वडगाव नगरपरिषद क्षेत्रात एक कोटी दहा लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, भाजप तालुका प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पोटोबा देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, तसेच गुलाबकाका म्हाळस्कर, मयूर ढोरे, सुनील ढोरे, नवनाथ हारपुडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळच्या जनतेने मला तिन्ही निवडणुकीत भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळे जनतेच्या या विश्वासाला उतराई होण्यासाठी सर्वाधिक निधी मावळमध्ये दिला आहे. वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहोचविण्याचे ध्येय ठेवले असून, अंतर्गत रस्ते, उद्याने, मैदाने विकसित केली आहेत.”
“तळेगाव-दाभाडे – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या कामाला लवकरच गती मिळेल. देहूरोड वायजंक्शन ते वाकड या रस्त्याचं काम सुरू आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. लोणावळा ते पुणे या तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारनेही आपला वाटा मंजूर केला आहे. विकासकामांमध्ये राजकारण न आणता, सर्वांनी मिळून मावळचा सर्वांगीण विकास साधावा.”
About The Author
