Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी भगवे वादळ घेऊन लाखो लोकांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने चिंचवड स्टेशन परिसरात जंगी स्वागत करण्यात आले.

पुण्याहून पिंपरी चिंचवडकडे निघालेल्या मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. चिंचवड स्टेशन येथे पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बॉम्बे सिलेक्शन शेजारी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर काही वेळ जरांगे पाटील थांबले होते. यावेळी क्रेनच्या सहाय्याने जरांगे पाटलांना तब्बल 25 फुटी हार घालण्यात आला. यावेळी अजित गव्हाणे मित्र परिवाराकडून मोर्च्यात सहभागी बांधवांना 10 हजार पाणी बॉटल तसेच 10 हजार बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जगदिश शेट्टी, उल्हास शेट्टी, मारूती भापकर ,पंकज भालेकर, रेखा गावडे, नारायण बहिरवाडे, धनंजय भालेकर, रंगनाथ गावडे, यश साने, निलेश शिंदे, सुदाम परब, विनोद जैन, प्रसाद कोलते, विशाल काळभोर, दिपक भापकर, ज्योती गोफणे, मनिषा गटकळ, पल्लवी पांढरे, पौर्णिमा पालेकर, पुष्पा शेळके, आशा शिंदे, आशा मराठे, विजया काटे, विनोद वरखडे, महेश झपके, प्रविण गव्हाणे, सुवर्णा निकम, सुनंदा कांबळे, धनाजी तांबे, सुनील अडगळे यांच्यासह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद शेट्टी, विनायक रणसुभे, दिपक साकोरे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *