पिंपरी : पिंपरी, मावळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत केले. पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी दिली.
खासदार बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मावळ तालुका युवसेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे ,चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, शहर संघटक युवासेना निलेश हाके उपस्थित होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपशहर प्रमुख चंद्रशेखर देवरे, त्याचे सहकारी, राष्ट्रवादीचे निलेश वाघमारे व त्याचे सहकारी, ठाकरे गटाचे गट शाखाप्रमुख दिपक शेरखाने, दापोडी मनसे शाखा अध्यक्ष गणेश काटे, सामाजिक कार्यकर्ते अजय कदम, महेंद्रे पोकळे कुष्ठ पिडीत समाज सामाजिक कार्यकर्ते सचिन कोष्टी, फुगेवाडी सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश जाधव, शिवशक्ती भीमशक्ती मंडळाचे अध्यक्ष मनोज कांची व त्याचे सहका-यांनी प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर, कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन इतर पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सामाजिक कार्यकर्तेही शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेत प्रवेशाचा ओघ सूरू आहे. मावळ, पिंपरी-चिंचवडमधील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. युवक शिवसेनेशी जोडले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित नुकताच किवळे येथे पक्षाचा मेळावा झाला. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युवकांनी जोमाने कामाला लागावे.