उमरगा : प्रतिनिधी
माऊली इंटरनॅशनल सी बी एस ई स्कुल,उमरगा येथे माऊली शाळेचा 10 वा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा 2024 हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्धघाटक मा. श्री.जितेंद्रजी शिंदे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा,व प्रमुख पाहुणे मा. श्री. गोविंद येरमे तहसीलदार उमरगा यांनी उद्धघाटन केले. त्यानंतर कुलस्वामिनी बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित माऊली स्कुलच्या प्राचार्या व अध्यक्षा मा. सौ मंगला शिंदे मॅडम, संस्थेचे सचिव मा श्री डॉ अभय शिंदे सर,ईतर उपस्थित सर्व मान्यवर मा.सौ सुलक्षणाताई जितेंद्रजी शिंदे माजी नगराध्यक्ष नगर परिषद उमरगा, मा.श्री.काकासाहेब साळुंखे विस्तार अधिकारी उमरगा, यांनी भारतीय संस्कृती प्रमाणे श्री गणेशाचे पूजन केले.
श्रीमती कमलताई नलवडे, प्रविण स्वामी माजी अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा,आणि सर्व मान्यवर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यांनंतर सर्व मान्यवराचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर माऊलीशाळेचे उपमुख्याध्यापक श्री श्रीशैल मुलगे सर यांनी शाळेने वर्षभर घेतलेले उपक्रम,विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये संपादन केलेले यश शाळेचा आहवाल पालकांसमोर मांडला तसेच कार्यक्रमासाठी उमरगा नगरीतील अनेक नामवंत व्यक्ती मा मनोजकुमार दिक्षित सर कुलस्वामिनी संस्थेच्या सदस्यां व माऊली प्रि प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी अभय शिंदे मॅडम,मा.डॉ राधिका शिंदे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून आपल्या देशातील विविध कला, शेती, विविध नृत्य प्रकारातून विविध सांस्कृतिचे दर्शन घडवले. कार्यक्रम हा नियोजितबद्ध करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक श्री.धीरज घोगे सर,प्रा श्री संजीव राठोड सर क्रिडा शिक्षक प्रा श्री.दिलीप चव्हाण ,प्रा श्री विजय सगर सर,प्रा लक्ष्मण जाधव ,प्रा ईश्वर सोनकवडे,प्रा गुंडाप्पा कुंभार व विशेषतः नृत्याची तयारी करून घेणाऱ्या शिक्षिका रंजना कांबळे,सुजाता जाधव,शेख निलोफर ईतर सर्व शिक्षिका शिक्षक आणि ईतर सर्व कर्मचारी यांनी कठीण परिश्रम घेतले. पालकांनी कार्यक्रमास भरपूर प्रतिसाद दिला.
यावर्षीचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आगदी दिमाखात पार पडला. शेवटी संस्थे तर्फ़े प्रा.श्री संजीव राठोड सर यांनी सर्व प्रमुख पाहुणे पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांने करण्यात आली.
About The Author

