आरपीआय शहर संघटक सचिवपदी निवड
पिंपरी : प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाच्या ( आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर संघटक सचिवपदी भोसरी लांडेवाडी येथील धडाडीचे कार्यकर्ते अक्षय दुनघव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या हस्ते दुनघव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या वेळी रिपाइंच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शेख यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दुनघव यांनी याआधी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष, शहर संघटक आणि शहर उपाध्यक्ष या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना पुन्हा एकदा शहर पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे.
या निवडीबद्दल राहूल काटे, चांगदेव गालफाडे, बळीराम गालफाडे, अनिल दुनघव, विकास चव्हाण, भिमराव जाधव, शांताराम मोरे आदींनी अक्षय दुनघव यांचे अभिनंदन केले. पदाच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांचे विचार व पक्षाची ध्येय्यधोरणे तळागाळात पोहोचविण्याचे काम केले जाईल. तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे दुनघव यांनी निवडीनंतर सांगितले.