भाजपातर्फे १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन “हर घर तिरंगा” अभियानाचे आयोजन
पिंपरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ०९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हर घर तिरंगा कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ) च्या वतीने मोरवाडी येथील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “हर घर तिरंगा” कार्यक्रम आयोजन बैठक पार पडली.
यावेळी, भाजपा शहर प्रभारी वर्षा डहाळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, दक्षिण भारत प्रकोष्ठ संयोजक राजेश पिल्ले, पिंपरी विधानसभा संयोजक संजय मंगोडेकर, सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, कविता हिंगे, अजित कुलथे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, प्रसाद कस्पटे, संतोष तापकीर, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजक नंदू कदम, नगरसेवक अभिषेक बारणे, मनीषा पवार, राजेंद्र गावडे, संदीप गाडे, संदीप कस्पटे, बाबा त्रिभुवन, सविता खुळे, राजेंद्र राजापुरे, बिभीषण चौधरी, शशिकांत पाटील, रवी देशपांडे, मधुकर बच्चे, कैलास सानप, गोरक्षनाथ झोळ, विजय भिसे, अमेय देशपांडे, सचिन राऊत, सनी बारणे, अतुल इनामदार, संकेत चौंधे, मंगेश धाडगे, गणेश ढाकणे, देविदास पाटील, सुप्रिया चांदगुडे, उपाध्यक्ष आशा काळे, चिटणीस राजश्री जायभाय, गिता महेंद्रु, महेश बारसावडे, डॉ. तृप्ती परदेशी, शोभा भराडे, संदेश गादिया, देवदत्त लांडे, मुकेश चुडासमा, पल्लवी मारकड, रेखा काटे, दिपाली धनुकार, दिपाली कलापुरे, कोमल गौडांडकर, संजय परळीकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी / प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, विधानसभा वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांनी भाजपतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या साप्ताहिक कार्यक्रमाची माहिती दिली. ९ ऑगस्टपासून प्रत्येक घरासाठी तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तिरंगी ध्वजांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी व राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीत शहरभर तिरंगा ध्वज फडकवून विधानसभानिहाय कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून चार सदस्यांची टीम तयार करून हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. 12 ते 14 ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या पुतळ्यांच्या जागेची स्वच्छता करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृति दिनानिमित्त इतिहासातीत त्या दुःखद काळातील सर्व पीडिताच्या धैर्य आणि संयमाचे कौतुक, तसेच भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी द्वेष आणि हिंसाचारामुळे लाखो बंधू-भगिनींना विस्तापित व्हावे लागले होते, यावेळी चर्चासत्र / संमेलनाचे आयोजन करुन प्राण गमावलेल्या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मंगोडेकर यांनी केले. आभार अजय पाताडे यांनी मानले.