पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या दोन गावांना जोडणारा पवना नदीवर नुतन समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलाचे संपुर्ण बांधकाम पुर्णत्वास आले असून तो लवकरच नागरिकांसाठी वाहतुकीस व दळणवळणास लवकरच खुला करण्यात येणार आहे.
या पुलाच्या कामाची मनपा स्थापत्य विभागाचे अधिकारी वर्ग व कंत्राटदार यांच्या समवेत कार्यक्षम नगरसेविका सौ.उषा संजोग वाघेरे पाटील तसेच युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी पाहणी केली, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या पुलाचे अंतिम कामे लवकर पुर्ण करून तो लवकरच नागरिकाना खुला करून द्यावा अशी सूचना देखील त्यांनी दिली. सदर पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर नक्कीच वाहतुकीची समस्या कमी होऊन नागरिक वाहतूक कोंडी पासून सुटकेचा निश्चास घेतील अशी प्रतिक्रीया त्यानी यावेळी दिली.
About The Author

