तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भारतीय संविधान ही लोकशाहीची मुळाक्षरे आहे. भारताच्या स्वतंत्र संग्रामातील कठोर संघर्षानंतर या संविधानाने आपल्या देशाला दिशा दिली. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून आपल्या सर्वांच्या समानतेचा स्वातंत्र्याचा बंधुतेचा आणि न्यायाचा मूलमंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाशिवाय संविधान तयार होणे अशक्य होते ही संविधान संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या संविधान संवर्धन व रक्षक पुरस्कार कार्यक्रमात केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व समग्र डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने संविधान संवर्धनासाठी विशेष कार्य करणाऱ्या देशभरातील व्यक्तींचा संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ जणांचा संविधान संवर्धन व रक्षक पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान तळेगाव दाभाडे येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
संविधानाच्या प्रचार, प्रसारासाठी तसेच संवर्धन, संरक्षणासाठी ही पुरस्कार देण्यात येत असल्याचेही यावेळी मिलींद शेलार यांनी सागीतले यावेळी येथील संविधान प्रदर्शनाचे उद्घाटन असिस्टंट कमांडेड शौर्य चक्र पुरस्कार विजेते भारत सरकार जिले सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या प्रमुख अतिथी मनोगतातून संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित प्रमुख अतिथी मनोगतातून व्यक्त करून पुलवामा मध्ये घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले देशाचे सीमेवर आणि देशाची अंतर्गत सुरक्षा करणारे सर्व सुरक्षा बले जशी आपल्याला सुरक्षा प्रदान करतात त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय ग्रंथ संविधान आपली नेहमीच सुरक्षा करतो असे यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आयपीएस डी कनकरत्नम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानास ‘सविधान भूमी’ या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले आले.
जमीन आणि आकाश बदलता येईल परंतु संविधान बदलण्याची ताकद कोणात नाही कारण संविधान न्याय समता समानता याची ग्वाही प्रत्येक नागरिकाला देते असे मत यशवंत मानखेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी जीएसटी आयुक्त आयआरएस डॉ. प्रशांत रोकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षा रंजनाताई भोसले, रो. सुनील रहाटे, रो. हिरामण बोत्रे, रो. संदीप मगर, रो.राजेंद्र पंडित, रो सुवर्णा मते, रो. उमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रो. संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
रो.सुमती निलवे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर सुनील रहाटे यांनी आभार मानले.