तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
विद्या प्रसारिणी सभा,पुणे या शैक्षणिक संस्थेमार्फत वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रकल्प स्पर्धेत व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल लोणावळा येथील शिक्षक श्री.बाळासाहेब म्हातारदेव खेडकर यांच्या आनंददायी शिक्षण या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी झालेल्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिक्षक संचालक तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद गोसावी साहेब हे उपस्थित होते.
श्री.खेडकर यांनी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या प्रकल्पासाठी मुख्याध्यापिका सौ.भारती लोखंडे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे मॅडम,कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी सर,सहकार्यवाह श्री.विजय भुरके सर यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.