Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

लोणावळा येथे १९२४ साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची कैवल्यधाम ही एक प्राचीन योग संस्था आहे. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेने आपली शतकपूर्ती केली आहे तसेच संस्थेच्या २०२३ – २४ या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. आपल्या शतकपूर्तीचे औचित्य साधून संस्थेने आयुष मंत्रालय नवी दिल्ली, इंडियन योगा असोशिएशन नवी दिल्ली, टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई यांच्या सहयोगाने ४ ते ७ डिसेंबर २०२४ रोजी कर्करोग में योग” व्याप्ति, प्रमाण एवं विकास” या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देश विदेशातील प्रतिनिधी Onsite आणि Online मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

४ डिसेंबर २०२४ रोजी परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिर्धीची नोंदणी (Registration) करण्यात आली तसेच परीषदे पूर्वी Workshop – Qualitative research methods in yoga आणि Workshop – Research methods for designing yoga studies in cancer या विषयांवरील दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी महर्षी पतंजली यांची मंगलमय वातावरणात पुजा करण्यात आली. यानंतर ११ व्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उद्घाटनाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली सन्मानीय प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी (Director of the Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer, Tata Memorial Centre) यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम योग संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, कैवल्यधाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, डॉ. सतबीर खालसा, डॉ. पो. जु.लिन आणि डॉ के. एस. गोपीनाथ यांच्या प्रमुख उपस्थितील दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांचा संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला. संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांना कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा आणि शाल देऊन सन्मानित केले. तसेच संस्थचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी व्यासपीठावरील मान्यवर डॉ. सतबीर खालसा, डॉ.पा.जु. लिन, डॉ. के. एस. गोपीनाथ यांचा शाल आणि योगविषयक पुस्तके देऊन सन्मान केला. यानंतर कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. सतबीर खालसा यांनी उपस्थितांना संबोधित केले. या नंतर “कर्करोग में योग” या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेतील प्रथम टप्प्यावरील कर्करोगावर योगाद्वारे मात केलेल्या बहुकुशल कामगार श्रीमती सुनीता फतरोड हिच्या जीवनावरील माहितीपट दाखवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.पा. जु. लिन आणि डॉ. के. एस. गोपीनाथ यांनी उपस्थितांना आपल्या भाषणशैलीतून संबोधित केले. यानंतर कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची, व संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांची चित्रफिती द्वारे माहिती संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी उपस्थितांना संबोधित कैले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन शनाया वात्सायन यांनी केले.”ओम पूर्ण मद” शांती पाठाने उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *