तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोतीबिंदू रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर मोफत असून सकाळी 10 तें 2 या वेळेत होणार असून रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले आहे.
या शिबिराचे उदघाटन मायमर मेडिकल कॉलेजचा व्यस्थापकीय संचालिका डॉ. सुचित्रा नागरे कराड यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी डॉ. महेश दर्पण गिरी रेखा भेगडे असिटंट गव्हर्नर अजित वाळुंज जिल्हा डायरेक्टर सुबोध मालपाणी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी सुरेश शिंदे यांना कर्तव्यदक्ष नागरीक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आणि रोटरी कॅम्युनिटी कॉम्सर्स आशा वर्कर्स तळेगाव दाभाडे सिटीचा शुभारंभ होणार आहे.