तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये संत संताजी महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे आणि माजी उपनगराध्यक्षा मीराताई फल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लिपिक प्रवीण माने, शिपाई चंद्रशेखर खंते, रुपेश देशमुख तसेच तेली समाजाचे शहर उपाध्यक्ष संजय कसाबी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप टेकवडे, गोकुळ किरवे, गणेश क्षीरसागर, तुषार जगनाडे, बाळासाहेब कसाबी, सुजित लोखंडे, सचिन टेकवडे आणि तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…