Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे ३०० वी जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने शिवसेवा प्रतिष्ठानने एक अभिनव उपक्रम केला आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांची माहिती असलेली एक डायरी २०२५ साठी संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

या डायरीत अत्यंत सुंदर मुखपृष्ठ, शिवसेवा प्रतिष्ठान या संस्थेची पूर्ण माहिती पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर यांची माहिती असलेली ४० पान जी सांगलीच्या लेखिका सौ विनिता ताई तेलंग यांनी लिहिलेली आहेत,त्याचबरोबर अत्यंत सुंदर अशी बारा चित्र जी पुण्यातील चित्रकार श्री चंद्रशेखर जोशी यांनी काढलेली आहेत. बरोबरीने प्रत्येक पानावर वॉटरमार्क मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे आराध्य असलेल्या महादेवाची पिंड आहे ३६५ दिवस रोज वाचता येईल, असे मातोश्रींबद्दल दोन काव्यओळी या डायरीत लिहिल्या गेल्या आहेत. या डायरीची पुर्ण माहीती संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय चंद्रात्रे यांनी कार्यक्रमात दिली.

या डायरीच्या प्रकाशनामुळे अनेक घरांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विविध गुणांवरती तरुणांना म्हणजेच आत्ताच्या पिढीला वाचन करता येणार आहे. पूर्ण वर्षभर ही डायरी बरोबर असल्यामुळे सतत त्यांच्या कर्तुत्वावर रोज काही ना काही माहिती मिळणार आहे. खरोखरच हा अभिनव उपक्रम खूपच छान झाला आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून सांगलीच्या लेखिका सौ विनिता तेलंग उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत सुबक आणि समर्पक शब्दात अहिल्यादेवींचे चरित्र मांडले.

देवावरची श्रद्धा,धर्मावरची श्रद्धा, मातोश्रीनी केलेली काम, काश्मीर पासून सोमनाथ पर्यंत बांधलेली देऊळ, धर्मशाळा, नद्यांवरचे घाट या संदर्भातली माहिती दिली..

आजच्या पिढीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांकडून कितीही समस्या आल्या तरी चांगल्या कामापासून न हटता सतत चांगल्यासाठी, समाजासाठी, धर्मासाठी काम करत राहिले पाहिजे ही शिकवण दिली.

त्यांच्या बरोबरीने प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री सोमनाथ देवकाते,पुणे.श्री विजय गोफणे, पुणे.लोनावळा येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनीही आपल्या बोलण्यातुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य पोहोचवण्याची आवश्यकता आहेअशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी आलेले आणि डायरीसाठी सौजन्य दिलेले अशा सर्वांनी मिळून या डायरीचं आज प्रकाशन केलं,श्री दत्तात्रय येवले, श्री ऋषिकेश लेंडघर, श्री अद्वैत बांबोली, श्री चेतन राणे, सौ ब्रिंदा गणात्रा, सौ परमेश्वरी दामले, श्री महेश भुसारी,श्री अशितोष जोशी, श्री देवा भाऊ गायकवाड, श्री निखिल कवीश्वर, श्री आशुतोष आठल्ले, श्रीमती निलाक्षी गोडबोले,सौ शुभदा मराठे( उज्जैन) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, मावळतील ग्रामीण भाग, तसेच लोणावळा येथील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष श्री अजित घमंडे यांनी सर्वांचे स्वागत केले, संस्थेचे सचिव श्री राजेश कामठे यांनी सूत्रसंचालन केले, श्रीमती लपालीकर यांनी गणेश स्तवन गाऊन सुरुवात केली, श्री प्रमोद देशपांडे यांनी शिवसेवा प्रतिष्ठानची नेहमी चालणारी कार्य या विषयावरती सर्वांना माहिती दिली. श्री राजेश येवले आणि श्री भगवान गायकवाड या संचालकांनी पाहुण्यांचे स्वागत केले, सौ संगीता चंद्रात्रे यांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता केली, शिवसेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी या डायरी उपक्रमाचे कौतुक तसेच चौकशी होती आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *