तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला व वाणिज्य महाविद्यालय वळवण लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक धनराज पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची विशेष दखल घेऊन ‘ ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त २०२४ या वर्षातील राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम ८ डिसेंबर२०२४ रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने श्री. एन. सी. संघवी उद्योजक डॉ. शंकर अदानी श्री. प्रवीण काकडे उपजिल्हा अधिकारी डॉ. संजय कुंडेरकर हातकंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच प्रा. धनराज पाटील यांना श्री. सूर्यकांत तोडकर विश्वस्त डॉ. डी वाय पाटील शिक्षण समूह यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
” राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार च्या सन्मानार्थ लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष मा. रमेशचंद्र नय्यर उपाध्यक्ष दत्तात्रय पाडेकर सचिव अडवोकेट नीलिमा किरी मॅडम खजिनदार दत्तात्रय येवले विश्वस्त नंदकुमार वाळंज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सर उपप्राचार्य डॉ. विलास पाटील सर महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.