तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
सी.आर.पी.एफ, ग्रुप केंद्र पुणे, आभिकांत फाऊंडेशन, रोटरी क्लब तळेगाव सिटी, रोटरि क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सी.आर.पी.एफ कैम्प मध्ये विश्व दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी क्षेत्रीय कावा अध्यक्षा सौ. अनुजा निंबाळकर मॅडम,तसेच प्रमुख मान्यवरांमधे सिने अभिनेत्री प्रांजल पवार, पुलिस उपमहानिरीक्षक श्री.वैभव निंबाळकर {भारतीय पुलिस सेवा} उप कमांडेट राजेंद्र प्रसाद, मावळचे बी.डी.ओ. कुलदीप प्रधान, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विलास काळोखे,रोटरी सिटीचे अध्यक्ष रो. किरण ओसवाल, रोटरी चॅलेंजर्सच्या संस्थापक अध्यक्षा रो.ज्योती राजिवडे, असिस्टंट गव्हर्नर रो.दिपक फल्ले, आभिकांत फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. आभिजीत तांबे, उपाध्यक्ष रो. भगवान शिंदे,सेक्रेटरी रो. सुरेश दाभाडे हे होते.
सूत्र संचालन रो. प्रदीप टेकवडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग मार्गदर्शन रो. तानाजीभाऊ मराठे , व्यवस्थापिका आभिकांत फाऊंडेशन सौ.मंगल चव्हाण, उद्योजक श्री.भरत राजिवडे, डायरेक्टर रो. प्रदीप टेकवडे यांनी केले व आभार निरीक्षक / जीड़ी. श्री. रामदास यशवंते ग्रुप केंद्र पुणे यांनी मानले कार्यक्रमात मुलांना जादूचे प्रयोग दाखवण्यात आले,चार्ली चापली व बलून खेळाचा दिव्यांग मुलांनी आनंद घेतला कार्यक्रम संपल्यानंतर सुरूची भोजनाचा सर्व मुलांनी आनंद घेतला.