तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील इंद्रायणी महाविद्यालय मध्ये बारावी सायन्स मध्ये शिकणाऱ्या आदित्य राऊत (वय 17) या विद्यार्थ्याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पंजा लढवणे (आर्म स्पॉट ) स्पर्धेत चम्पियन सुवर्ण पदक पटकवले.या अगोदर आदित्य ने जिल्हा राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे.
यावेळी क्रीडा प्रकार नवीन असून आदित्य ने कोणत्याही क्रीडा संस्थेत प्रवेश घेतलेला नाही. त्याला कोणाचेही मार्गदर्शन झाले नाही. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असुन त्याच्या आई वडिलांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
त्यातच एशियन चॅम्पियन साठी आदित्य चीं निवड झाली असून त्याला या स्पर्धेसाठी आर्थिक व योग्य मार्गदर्शना चीं गरज आहे.
आदित्य सारख्या होतकरू खेळाडूस योग्य मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ मिळाल्यास नक्कीच तो यशस्वी होतील.