तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने सामाजिकबांधिलकी जपत बस, रेल्वे स्थानक परिसरामध्ये उघड्यावर राहणाऱ्या गरजू लोकांना थंडीपासून बचाव होण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप करुन मायेची ऊब दिली. १६ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रोटरी क्लबचे सदस्य यांनी या परिसरामध्ये जात थंडीत कुळकुळत झोपणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ब्लँकेट टाकल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले यात अनेक जण अपंग आहेत, अशा व्यक्ती राहण्यास निवारा नसल्याने बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात झोपतात. अशा नागरिकांना रोटरी क्लबच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष नारायण शारवळे, माजी अध्यक्ष दिलीप पवार, नितीन कल्याण,रवींद्र कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.