तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
ब्रह्मांड फाउंडेशन संचलित ब्रह्मांड किड्स प्री स्कुलचे द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत संपन्न झाला.
मुलांना प्रोत्साहन व पालकांशी संवाद साधन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमंत सरदार याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार तसेंच प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.डॉ.प्रमोदजी बोराडे व इतिहास संशोधिका डॉ.प्रिया बोराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या पाल्याला उत्कृष्ठ शाळा कोणती असावी याचा शोध ब्रह्मांड पूर्व प्राथमिक शाळेत येऊन थांबेल असा विश्वास स्कुलच्या संस्थापक प्रा.चित्रा सचिन मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये स्पष्ट केले.
तसेच सुप्रसिद्ध संशोधक व व्याख्याते डॉ.प्रमोद बोराडे ह्यानी पालकांना “आदर्श शाळा आणि पालकत्व…” ह्या बद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आपल्या पाल्यांना सवयी लावतांना पालक अतिशय सतर्क असायला हवेत. आपली अपत्य केलेल्या संस्कारातून नाही तर आपल्या दैनंदिन आचरणातून घडत असतात. नवी पिढी कर्तृत्ववान घडविण्यासाठी आज पालक म्हणून जबाबदारी फार मोठी आहे.”
श्रीमंत याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी सर्व बालचमुना शुभेच्छा तथा आशीर्वाद दिले. सुत्रसंचालन सौ. विनया केसकर यांनी केले…