तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिध्द असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी शहरामध्ये असणं ही नित्याचीच बाब झालेली आहे. असंख्य पर्यटक भेट देत असल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होणे,तासनतास ट्रफिक जाम होणे यामुळे शहराचे पर्यटनावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.
भविष्यात पर्यटकांचे संख्येत वाढच होणार असल्यामुळे शहरातील ट्रफिक समस्या व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी ही परिस्थिती भयावह असणार आहे. यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक असून नगरपरिषद परिक्षेत्रातील वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे व हा रस्ता कायम स्वरुपी महामार्गावरील वाहतूकीची कोंडी सुटेल तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यतचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अश्या प्रकारचे लेखी निवेदन लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि माजी उप नगराधक्ष श्रीधर पुजारी यांनी देशाचे रस्ते व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले