तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंदसिंह यांचे पुत्र जोरावर सिंह आणि फत्तेसिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेचे भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लिपिक प्रविण माने, विलास वाघमारे, आदेश गरुड, प्रफुल्ल गलियत, चंद्रशेखर खंते, अतिक्रमण कर्मचारी अंकुश जाधव, सागर वाघेला, आकाश बीडलान, प्रकाश मकवाना आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.