तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ पाठारे यांच्या संकल्पनेतुन गरजु निराधार व्यक्तींना मदत(आधार)म्हणुन गेली ६२ महिने आधार फाऊंडेशन च्या वतीने मदत(सेवा)केली जात आहे. . निराधार व आर्थिक दृष्टया दुर्बल कुटुंबांना धान्य व इतर दैनंदिन वापराच्या वस्तु विनामुल्य वाटप करण्यात आले आहे.
आधार फाऊंडेशन लोणावळा संस्थेच्यावतीने ६३ व्या महिन्याचे धान्य किट विरुगुळा केंद्र (जेष्ठ नागरिक संघ ) भांगरवाडी लोणावळा येथे वाटप करण्यात आले . तसेच मावळचे माजी मंत्री लोकनेते बाळाभाऊ भेगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री तारासिंग बोहरा , श्री महेश बुटाला व श्री हनुमंत साबळे ह्यांच्यावतीने मिठाई वाटप करण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे श्री प्रकाश सुर्यवंशी लोणावळा नगरपालिका अधिकारी , डॉ कविता कचरे मॅडम , श्री तारासिंग बोहरा भाजपा सोशल मिडीया संयोजक , श्री हनुमंत साबळे भाजपा बुथ अध्यक्ष कुसगांव बुद्रुक , श्री महेश बुटाला , श्री संतोष गुंड , श्री रवी भोसले .आधार फाऊंडेशनच्या कार्यास प्रभावित होऊन माजी नगरसेविका सौ कांचनताई लुणावत व जाईबाई रोंदळ ह्या नवीन सभासद सहभागी झाल्या , त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आधार फाऊंडेशनचे सचिव श्री पांडुरंग तिखे यांनी केले. आधार फाऊंडेशनच्या कार्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे यांनी दिली.उपस्थितांचे आभार श्री गणेश जाधवसाहेब यांनी मानले.
तसेच आधार फाऊंडेशनच्या वतीने आधार फाऊंडेशनचे सभासद श्री गणेश जाधवसाहेब ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .प्रकाशभाऊ पाठारे,पांडुरंग तिखे, विठ्ठल जाधव,भगवान घनवट,शशिकांतजी खंडेलवाल,हनुमंत साबळे, मनिषाताई भांगरे, गणेश जाधवसाहेब, भगवतीप्रसाद आगरवाल,राजेंद्र लाड,दत्ताभाऊ लाड,राजुभाई शेख,उत्तम ठाकर,प्रफुल खंडेलवाल, दत्ताभाऊ वाळंज,सुनील पानगावकर, अस्लम सय्यद,राजेंद्र मांढरे, सत्यनारायण आगरवाल, श्रीमती संध्याताई गव्हले,सुमन ढाकोळ मावशी , मृदुला पाटील,रश्मीताई शिरसकर , शोभा मांढरे ,ज्योतीताई रांगणे,प्रतिक्षाताई महाडिक आदि सर्व आधार फाऊंडेशनचे सदस्य यांनी यासाठी परिश्रम घेतले.