तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व असणारे प्राध्यापक डॉ. पवन रामू शिनगारे यांची २६ जानेवारी २०२५ रोजी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचालनाकरिता महाराष्ट्र संघनायक म्हणून निवड झालेली आहे. डॉ. पवन शिनगारे हे मागील १० वर्षांपासून लोणावळा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना चे युनिट यशस्वीपणे चालवत आहेत. डॉ. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. जयवंत दळवी या विद्यार्थ्याची २६ जानेवारी २०२३ मध्ये कर्तव्य पथावरील संचालानामध्ये निवड झाली होती.
२६ जानेवारी रोजी हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. या देशभक्तीपर प्रसंगी आधी विद्यार्थी जयवंत दळावी (२०२३) तदनंतर त्यांचे मार्गदर्शक डॉ. शिनगारे यांची संघनायक म्हणून निवड झाल्यामुळे लोणावळा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू यांचेसह प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला स्नेहभोजनाचा व भारतचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे सहसुद्धा दुपारचे स्नेहभोजनाचा योग डॉ. शिनगारे यांना सदर निवडीमुळे प्राप्त झालेला आहे.
डॉ. शिनगारे हे राष्ट्रीय सेवा योजना, पुणे जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम पाहत असून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे एकमेव निवड झालेली आहे. त्यांच्या संघात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून एकूण १४ स्वयंसेवक आहेत.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर तसेच महाविद्यालायचे आजी-माजी विद्यार्थी यांनी डॉ. पवन शिनगारे यांना कर्तव्य पथावरील संचलानाकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, सविव एडव्होकेट नीलिमा खिरे, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, सहसचिव अजय भोईर, विश्वस्त शैला फासे आणि सुनील ठोंबरे, महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. विशाल पाडाळे, डॉ. दिगंबर दरेकर, सौ. नेहा पाळेकर व प्राचार्य नरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत डॉ. पवन शिनगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.