तळेगाव दाभाडे :प्रतिनिधी
तणावमुक्ती साठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. मी स्वतः योग निद्रा चा अभ्यास केला असून आपल्या भेटीमध्ये कैवल्यधाम संस्थेचे योग क्षेत्रातील कार्य बघून मी प्रभावित झालो असे ते यावेळी म्हणाले. मानसिक व शारीरिक ताणतणाव कमी करण्यासाठी पोलिसांना योग प्रशिक्षण घेण्यासाठी कैवल्यधाम संस्थेत पाठविण्याचा निर्धार त्यांनी या प्रसंगी केला. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित केले.
लोणावळा योग संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे आणि अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम येथे जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या पोलीस योग प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सभागृहात कैवल्यधाम, लोणावळा योग संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी आणि पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी यांच्या शुभहस्ते पोलीस योग प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी व योगशिक्षक वर्ग तसेच पिंपरी-चिंचवड चे महिला व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. सर्वप्रथम पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांनी कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी तसेच संस्थेचे डॉ. शरदचंद्र भालेकर, श्री जी.एन. मूर्ती, सौ. अश्विनी मुडलगीकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यानंतर श्री सुबोध तिवारी यांनी योग प्रशिक्षण संदर्भात माहिती सांगितली. योगाभ्यास करण्याबरोबरच योगाचा अनुभव करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस “योगमय” करण्याचा संदेश दिला. या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखविण्यात आला तसेच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षाची चित्रफित दाखविण्यात आली व कैवल्यधाम मध्ये पूर्वी राबविलेल्या पोलीस प्रशिक्षणाच्या चित्रफिती सादर करण्यात आल्या.
कैवल्यधाम संस्थचे व्याख्याते डॉ. शरदचंद्र भालेकर यांनी “योगासह तणाव व्यवस्थापन” या विषयावर प्रायोगिक सत्र घेतले. या सत्रात त्यांनी “भामारी प्राणायाम” चा अभ्यास घेतला. पोलिसांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना मानसिक संतुलन कसे राखता येईल याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.
योग शिक्षिका कुमारी पूर्वा सातकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता “ओम पूर्ण मद..” शांती पाठाने करण्यात आली.
कैवल्यधाम संस्थेमध्ये जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान ४ तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४ दिवसांचे पोलिसांना योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा निश्चितच पोलीस वर्गाला ताणतणाव कमी करण्यासाठी लाभ होणार आहे.