तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ – नाणीजधाम महाराष्ट्र यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा गुरुवार दि. ९ व १० जानेवारी २०२५ सकाळी ९ वा. रोजी, महालक्ष्मी लॉन्स, पुणे नगर रोड, खराडी बायपास जवळ, जुन्या जकात नाक्या समोर, पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे.
या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्यास आपल्या जीवनात येणाऱ्या विविध प्रापंचिक समस्यांवर जगद्गुरुश्री स्वतः आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणास अध्यात्म , विज्ञान व व्यवहार याची योग्य सांगड घालून जीवन कसे जगावे यावर सुंदर मार्गदर्शन लाभणार असल्याचे आयोजक मुख्यपीठ नानिज्धाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र यांनी व्यक्त केले आहे.
या महन्मंगल समयी आपण सहकुटुंब, सहपरिवार, इष्टमित्र आप्तेष्टांसह कार्यक्रमास उपस्थित राहून जगदगुरुश्रींच्या प्रवचनाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी ही विनंती आयोजकांनी केली आहे.