तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा नगरपरिषदेच्या १ ली ते १० वी शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम यात नृत्य स्पर्धा मोठ्या थाटात पार पडल्या या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून श्रेया रहाळकर व श्रावणी कामत होत्या.
पत्रकार सुनील म्हस्के सर्व शाळांचे मुख्याध्यापक, इनचार्ज,सर्व शिक्षक वृंद एकूण ४५ शिक्षक व ३०० विदयार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सौ ज्योती चव्हाण यांचा गट क्र.८ च्या ६ सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ सुचेता एखे यांनी केले. कार्यक्रमात एकूण १० नृत्ये सादर केली गेली यातील सर्वच नृत्ये कौतुकास्पद होती.
प्रथम क्रमांक, शाळा क्र.५ भांगर वाडीच्या खाऊ कष्टाची भाकर या शेतकरी नृत्याने पटकावला, दितीय क्रमांक- गवळीवाडा शाळा क. ६ च्या ‘आई जगदेने’ या नृत्याने मिळवला.तर तृतीय क्रमांक. वलवण शाळा क्र. ७ च्या ‘कुऱ्या चालल्या रानात यांना मिळाला, शाळा क्र. ८ नांगरगावच्या जय देवी मंगळागौरी व मुलाची शाळा क्र. १ यांच्या आम्ही धनगर या दोन नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली म्हणून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. निकाल जाहिर करण्याआधी परिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्योती चव्हाण यांनी आभार मानले. विद्यार्थी, सर्व शिक्षक व उपस्थित मान्यवर यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.