तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कलापिनीत रविवार दि.५ रोजी कै.मेजर ना.वा.खानखोजे ,स्मृती चित्रकला स्पर्धा मोठ्ठया उत्साहात पार पडल्या.शालेय विद्यार्थी तसेच खुल्या गटातील पालक असा ५५० स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद स्पर्धेला होता.स्पर्धेपूर्वी कॅ.किरण खानखोजे ,रोटरीयन श्री व सौ धनंजय मथूरे आणि कलामंडळ प्रमुख चेतन शहा,संजय मालकर यांच्या हस्ते नटराजपूजन करण्यात आले.
सकाळी ८ ते १० या वेळेत पाचवी ते दहावी आणि १०:३० ते ११:३० या वेळेत बालवाडी ते ४ थी तसेच खुल्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या.
चित्रे काढताना सर्वच स्पर्धकांच्या चेहे-यावर उत्साह अगदी स्पष्टपणे दिसत होता.कॅ.खानखोजे आणि श्री.धनंजय मथुरे यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.५ वी ते १० वी तील अंतिम फेरीसाठी पात्र स्पर्धकांची निवड केली. १२जानेवारीला आता तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ५वी ते १० वी या गटातील स्पर्धकांसाठी दुपारी १ ते ३ या वेळेत कार्यशाळा होईल आणि दुपारी ३ ते ४:३० या वेळेत अंतिम फेरी होइल. त्याच दिवशी संध्याकाळी ५:३० वा. संपूर्ण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे .तेंव्हा सर्व स्पर्धकांनी आवर्जून उपस्थित राहावे.
स्पर्धेचं संयोजन स्पर्धा प्रमुख अशोक बकरे आणि दिपाली जोशी यांनी केले. महिलामंच, स्वास्थयोग,रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे यांच्या सहकार्यांने चित्रकला स्पर्धा उत्तम पार पडल्या. शेवटी सर्व मुलांना बिस्किटाचे पुडे खाऊ म्हणून देण्यात आले.