आधार फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांत व शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनीलभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त
तळेगा दाभाडे : प्रतिनिधी
आधार फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांत व शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनीलभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना तिळगुळ चिक्की, केळी व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव, केवरे,डोंगरगाव वाडी व ओळकाई वाडी ह्या शाळेत करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चैतन्य नागरिक पतसंस्थेचे संस्थापक श्री मारुतीदादा साठे, संचालक श्री कांताराम दळवी, डोंगरगावचे सरपंच श्री सुनील येवले, ग्रा.पं.सदस्य श्री देवाभाऊ दळवी, डोंगरगाव भाजपाचे अध्यक्ष मदन नानेकर, कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे , श्री पांडुरंग तिखे, श्री गणेश जाधवसाहेब, श्री भगवतीप्रसाद आगरवाल, श्री बबन दादा फाटक, श्री दत्ताभाऊ वाळंज, श्री भगवान घनवट , श्री प्रमोद बंसल,श्री दत्तात्रय लाड, श्री राजुभाई शेख, श्री पांडुरंग बोराडे , श्री उत्तम ठाकर, सौ मनिषाताई भांगरे, श्रीमती प्रभाताई आकोलकर, श्रीमती सुमन ढाकोळ व श्री हनुमंत सहादु साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.