Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

सळसळता उत्साह, मुलांचा चिवचिवाट, सुंदर सुंदर रंगीबिरंगी चित्र, वेगवेगळे रंग अस चित्र ५ जानेवारी आणि १२ जानेवारी २०२५ ला दिवसभर आपल्या कलापिनीच्या प्रांगणात दिसत होत. कारण होतं कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा २०२५.

प्राथमिक फेरी ५ जानेवारीला संपन्न झाली. इयत्ता १ ली ते १० वी आणि खुला गट ह्यात ५५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांना दिलेल्या विषयांवर त्यांनी खूप सुंदर चित्र रेखाटली.

१ ली ते ४ थी आणि खुला गट यातील बक्षिसपात्र मुले प्राथमिक फेरीतून निवडली गेली, तर ५ वी ते १० वी तील मुले कार्यशाळा आणि चित्रकला अंतिम फेरीसाठी निवडली गेली.

१२ जानेवारीला वॉटर कलर यावर आधारित कार्यशाळा घेण्यात आली . ह्या साठी सौ भावना अडसूळ , सौ अपर्णा खांडवे आणि सौ सुप्रिया खानोलकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.

मग त्या मुलांची अंतिम फेरी घेऊन त्यांची चित्रे बक्षिसासाठी निवडली गेली. खूप खूप उत्साहात मुलांनी कार्यशाळेचा आनंद घेतला.

बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी घेतला गेला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मिलिंद शेलार अध्यक्ष रोटरी क्लब एमआयडीसी आणि श्री मनोज ढमाले नामवंत उद्योजक उपस्थित होते.

श्री मनोज ढमाले यांनी डॉक्टरांचे आभार मानले की त्यांना स्पर्धे साठी खारीचा वाटा उचलण्याचे समाधान दिले.

मनुष्य म्हणून जगायचे असेल तर कोणतीतरी कला अवगत पाहिजे असेही त्यांनी सांगित ले.श्री मिलिंद शेलार यांनी मुलांना खूप सुंदर मार्गदर्शन करीत त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांना इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्यामुळे कलापिनीच त्यांनी भरभरून कौतुक केलं.

श्री किरण खानखोजे यांच्या भगिनी सौ अपर्णा खांडवे यांनी सुद्धा कलापिनी चे स्पर्धचे संयोजन बघून कौतुक केले. श्री किरण खानखोजे यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि दिव्यागं चित्रकारांच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी ड्रॉईंग ब्रश संचाचे वाटप केले.

स्पर्धा प्रमुख श्री अशोक बकरे ह्यांनी प्रास्ताविक केले . दिपाली जोशी ह्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राखी भालेराव ह्यांनी केले. बक्षीस समारंभाचे सूत्र संचालन मीरा कोंनुर् यांनी केले . रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे , पांडुरंग देशमुख,किसन शिंदे,रुपाली पाटणकर, जान्हवी पावसकर, सोनाली पाडळकर,ज्योती ढमाले, लीना परगी , ज्योती गोखले, अपूर्वा गुरव, रुपाली ठाकूर देसाई, शुभांगी देशपांडे, उमा भालेराव, विद्या अडसूळह्यांची संपूर्ण कार्यक्रमाला मदत झाली.

पालक , प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी श्लोक म्हटला गेला. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

चित्रकला स्पर्धा २०२५ निकाल:

बालगट – ओवी दिनेश जगदाळे. कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम, अनुश्री राजेश शिंदे. माउंट सेंट ऍन द्वितीय, इरा ज्ञानेश्वर वाघमोडे. पुणे सेंटर स्कूल तृतीय, स्वानंदी पंकज मालुंजकर. सरस्वती विद्यामंदिर उत्तेजनार्थ, राजवीर भाऊसाहेब उजगरे. उत्तेजनार्थ, वैष्णवी अमित भुजबळ. माउंट सेंट ऍन प्रोत्साहन पर आहाना डावखरे. किडझी प्रोत्साहन पर.

१ ली २ री गट – श्लोक गणेश केदार. माउंट सेंट ऍन हायस्कूल प्रथम, पालवी योगेश कुलकर्णी. पैसा फंड प्राथमिक शाळा द्वितीय, आरोही दिनेश जगदाळे. कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, अद्वैता कुलकर्णी. बालविकास विद्यालय तृतीय, सावी राजगुरव. डी वाय पाटील हायस्कूल तृतीय, वीरा गणेश कुंभार. जैन इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ, स्वरा गौरव वालझडे .जैन इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ, गायत्री अनिल शेलार .पैसा फंड प्राथमिक शाळा उत्तेजनार्थ, मानस पाटसावणे संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६उत्तेजनार्थ, प्रत्युषा अमोल नवले. पैसा फंड प्राथमिक शाळा प्रोत्साहन पर, मुक्ता विनोद शिंदे. माऊंट सेन्टेन्स स्कूल प्रोत्साहन पर, राजश्री भोसले .पोतदार इंग्लिश स्कूल प्रोत्साहन पर.

गट ३री ४थी – ऋषभ सागर ताडे. बालविकास विद्यालय प्रथम, श्रुती सागर नलावडे. पैसाफंड प्राथमिक शाळा द्वितीय, प्रणवी राजगुरू. बालविकास विद्यालय द्वितीय, आयात इरफान शेख. बालविकास विद्यालय तृतीय, शौर्य योगेश घोंगे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे तृतीय, कार्तिक अजित शेलार. जैन इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ, यश सूर्यकांत सोनावणे. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक ३ उत्तेजनार्थ, शास्वत अनिश भट. पोद्दार int. स्कूल उत्तेजनार्थ, कृत्तिका काळे. प्रोत्साहन,‌ क्रिया कर्णवट. D y पाटील प्रोत्साहन.

इयत्ता ५वी ते ७ वी गट – अनूर्वा कुलकर्णी. सरस्वती विद्यामंदिर प्रथम, शर्वरी शेखर घुले. सरस्वती विद्यामंदिर द्वितीय, शर्वरी मनोहर येवले. बाल विकास तृतीय, समर्थ संजय निकम. रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन उत्तेजनार्थ, जीविका शिंदे बालविकास उत्तेजनार्थ, शंभुराजे दिलीप शेडगे. छत्रपती शिवाजी विद्यालय प्रोत्साहन पर, शौनक गणेश शिंदे सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल प्रोत्साहन पर, रतन संजय सागर . प्रज्ञानबोधिनी प्रोत्साहन पर, अनविता मनोज तुपे. सरस्वती विद्यामंदिर प्रोत्साहन पर.

इयत्ता ८वी ते १०वी गट – तनवी शरद मलघे. बालविकास प्रथम, समीक्षा गणेश हिंगे. कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, कृष्णा सुनील वाघमारे. न्यू इंग्लिश स्कूल वडगाव तृतीय, प्रिया भीम साबळे. संकल्प इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ, अनुश्री अमोल दगडीया. बालविकास विद्यालय उत्तेजनार्थ, दिव्या भाकरे सह्याद्री इंग्लिश स्कूल प्रोत्साहन पर, नेहा सोमनाथ कुंभार नवीन समर्थ प्रोत्साहन पर.

खुला गट (पालक) – गायत्री अंकुर शुक्ल प्रथम, सारिका अमोल नवले द्वितीय, ऋतुजा अशोक खोत द्वितीय, कोमल आनंद डावखरे तृतीय, राहुल रवींद्र देसाई उत्तेजनार्थ, सोनाली सचिन पाडळकर उत्तेजनार्थ, नीता धोपाटे उत्तेजनार्थ, प्रिया म्हात्रे प्रोत्साहन पर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *