ऐतळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा येथे SRCC मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा आयोजित लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ .०० वाजता शिवदुर्ग हॉल, प्रियदर्शनी संकूल,जैन मंदिरा शेजारी, गावठाण येथे करण्यात आले आहे.
या शिबीरात मुंबई हून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील खालील लक्षणांची तपासणी करून त्यावर पुढील उपचार सुचवले जाणार आहेत. यामध्ये १ . चालण्यात असंतूलन, २ . अवयवांचे विकार, ३ . स्नायुंचे विकार, ४ . हाडांना झालेली दुखापत, ५ . सेरेबल पाल्सी, ६ . पाठीच्या कण्याचे विकार, ७ . स्वमग्नता, ८ . अतिचंचलता, ९ . फिट / झटके येणे, शुद्ध हरपणे, १० . स्नायुंचे आखडणे, ११ . शिक्षकण्यातील अक्षमता, १२ . अनुवांशिक विकार, १३ . भौतीक उपचार, १४ . स्पीच थेरपी, १५ . मानसशास्त्र व वर्तणूक थेरपी, १६ . नजरेतील दोष या सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या अंगणवाडी / बालवाडी / नर्सरी /शाळेतील विद्यार्थी , आपली अथवा आपल्या परिचीत कोणी मुले असल्यास या विनामुल्य शिबीराचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब कडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क आनंद गावडे -(सर) ८८०६८८८८०५ , ८८८८००७५८८, आशिष मेहता-(रोटरी क्लब )-९२२६२२०१४८ या नंबर वर संपर्क साधावा अशी आवाहन करण्यात आले आहे