

देहूरोड : प्रतिनिधी
देहूरोड येथील जय शंकर शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री उत्सव भक्तिमय आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला बुधवारी महाशिवरात्री दिनी होम अमावून अभिषेक आधी कार्यक्रम पार पडले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी देहूरोड परिसरातील हजारो शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद वाटप प्रसंगी जय शिवशंकर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किसनराव नेटके सरचिटणीस चिलू राम दांगट पाटील, खजिनदार परशुराम दांगट पाटील, तसेच श्रीरंग दांगट पाटील, युवा सेना मावळ तालुका सचिव विशाल दांगट पाटील, विजय दांगट पाटील आदी उपस्थित होते.
शिवरंजन दांगट, लक्ष्मण दांगट, मयूर दांगट, ओमकार दांगट, उत्कर्ष दांगट सनी दांगट, आदित्य बारणे, सार्थक दौंडकर, अनिल भोसले, विकास थोरात यांनी महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान महाप्रसाद वाटप कार्यक्रमासाठी युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र त्रस शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव भारतीय जनता पक्षाचे संजय पिंजन शिवसेना देव रोड शहर प्रमुख संदीप बालघरे यांनी भेट दिली. तसेच या मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.